अज्ञात वाहनाच्या धडकेत डॉक्‍टर ठार

कराड – अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्‍टर जागीच ठार झाले. हा अपघात मलकापूर येथील पुणे-बेंगलूर महामार्गावरती एनपी मोटर्ससमोर सोमवारी पहाटे झाला.

अनिरूध्द धदिच (वय 24, रा. अंपायर हिल, कोयना वसाहत, मलकापूर) असे अपघातात ठार झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. अधिक माहिती अशी, अनिरूध्द यांनी कृष्णा मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. ते कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सराव करत होते. रविवारी ते कोल्हापूरला दुचाकीवरून कामानिमित्त गेले होते.

सोमवारी पहाटे ते मलकापूरला परतताना नांदलापूर येथील एनपी मोटर्ससमोरील महामार्गावर अनिरूध्द यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये डॉ. अनिरुद्ध हे जागीच ठार झाले. त्यांना कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार इनामदार तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.