विश्‍वासार्हता निर्देशांकात डॉक्‍टर प्रथम स्थानी; भारतीयांचा लष्कराच्या जवानांवर अधिक विश्वास

लंडन – 2021 या वर्षासाठी ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस म्हणजे जागतिक विश्वासार्हता निर्देशांकाचे परिणाम घोषित झाले असून त्यामध्ये जागतिक स्तरावर डॉक्‍टरांनी पहिले स्थान मिळवले आहे. भारतीयांचा विचार करता डॉक्‍टरशिवाय त्यांचा लष्कराचे जवान शिक्षक आणि वैज्ञानिक यांच्यावर जास्त विश्वास आहे.

लोकांचा सर्वात कमी विश्वास असणाऱ्यामध्ये राजकीय नेते, मंत्री, वकील, बॅंकर, पत्रकार आणि एक्‍झिक्‍यूटिव्ह यांचा समावेश आहे. फ्रान्समधील पस नावाच्या कंपनीने जगातील 28 देशांचे सर्वेक्षण करून हा अहवाल जाहीर केला आहे. अहवालातील निष्कर्षप्रमाणे करोना महामारीच्या कालावधीमध्ये लोकांचा डॉक्‍टरांवर विश्वास वाढत चालला आहे. तर जगातील सर्वच देशातील नागरिकांनी राजकीय नेत्यांवर विश्वास नाही असे मत नोंदवले आहे.

राजकीय नेते किंवा मंत्री आश्वासने तरी देतात पण ती पूर्ण करण्याबाबत कोणतेही गांभीर्य त्यांच्याकडे नसते. त्यामुळे राजकीय नेते किंवा मंत्री विश्वासार्ह नसतात असे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या भारतीय नागरिकांनी भारतीय वृत्तवाहिनीतील अँकरबाबतही अविश्वासाची भावना व्यक्त केली आहे. हे अँकर्स विनाकारण वादविवादाचे विषय घेऊन वातावरण बिघडवतात असे भारतीयांचे म्हणणे आहे.

 या सर्वेक्षणामध्ये डॉक्‍टर्स, इंजिनिअर्स, वकील पत्रकार धार्मिक संस्थाचे पदाधिकारी पुजारी शिक्षक वैज्ञानिक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी पोलीस न्यायाधीश या सर्व व्यवसायांचा समावेश करण्यात आला होता लोकांनी या सर्व व्यवसायांचा विचार करून डॉक्‍टर सर्वात विश्वासार्ह असल्याचा दाखला दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.