डॉक्‍टर महिला आत्महत्या प्रकरण; दीर आणि जावेला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – डॉक्‍टर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणात दीर आणि जावेला अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी मंजुर केला आहे.

दीर प्रदीप ऊर्फ राजू ज्ञानोबा बेदरकर आणि जाऊ प्रियांका अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड. खंडेराव टाचले आणि ऍड. मनिष मगर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पती यालाही उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. त्याने ऍड. अभिषेक कुलकर्णी यांचेमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.

रोशनी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, तिचे वडिल अनिल काट्‌काडे याने देहुरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 19 जानेवारी रोजी घडली. चारित्र्याच्या संशयावरून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. प्रदीप हा अभियंता असून, तो आणि त्याची पत्नी तपासास सहकार्य करण्यास तयार आहेत.

दोघांची एफआयआरमध्ये नावे नाहीत. केवळ एकत्र राहायला असल्याने नाव आले आहे. नवऱ्याला उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व मंजुर केला आहे. दोघांना अटकपूर्व मंजुर करण्याचा युक्तीवाद ऍड. खंडेराव टाचले यांनी केला. त्यानुसार पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, तपासास सहकार्य करणे आणि देश न सोडण्याच्या या आणि इतर अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.