मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे ‘डॉक्‍टर आपल्या दारी’ उपक्रम

पुणे – महापालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या वतीने मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे “डॉक्‍टर आपल्या दारी’ हा उपक्रम शहरात सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्‍तींना किरकोळ आजार आसतील परंतु ते आपल्या फॅमिली डॉक्‍टरकडे जाऊ शकत नसतील अशा रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे.

सद्य:स्थितीत फक्‍त ताप, खोकला ,सर्दी, अंगदुखी, डोळ्यांचा दाह, सूज, नाक गळने या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातील. शहरात विविध परिसरात ज्याठिकाणी व्हॅन उभी असेल तेथे रुग्णांना येण्याची विनंती लाऊडस्पीकरद्वारे केली जाईल. तपासणीच्या वेळी डॉक्‍टर कोणाच्याही घरी येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

कोणत्याही प्रकारची शंका असल्यास किंवा डिस्पेन्सरी व्हॅनची मागणी असल्यास अशोक पवार – 9423009687, विलास राठोड – 9890174007, शशिकांत मुनोत – 9420477052 यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान, या उपक्रमाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वागत आणि कौतुक केले आहे. जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि फोर्स मोटर्सचे मोहोळ यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.