सिझेरियम ऑपरेशमध्ये महिलेचा मृत्यू प्रकरणात दोन डॉक्‍टरांना दहा वर्षे तुरूंगवास

पुणे- सिझेरियनच्या ऑपरेशनमध्ये 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणात दोन डॉक्‍टरांना सदोष मनुष्यवध प्रकरणी दहा वर्ष साधी कैद आणि अडीच लाख रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश विक्रम जगदाळे यांनी सुनावली.
डॉ. जितेंद्र शिंपी आणि डॉ. सचिन हरी देशपांडे या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले.
मे 2012 मध्ये अथश्री हॉस्पिटल आदर्श नगर किवळे येथे हा प्रकार घडला. राजश्री अनिल जगताप ( वय 22 ) या महिलेचा सिझेरियनच्या ऑपरेशन दरम्यान गुंतागुंत झाल्यामुळे मृत्यू झाला. संबंधित डॉक्‍टर प्रसूतिशास्त्र तज्ञ नसताना आणि कायदेशीर रित्या ऑपरेशन करण्यास सक्षम नसताना, सिझेरियन केल्यावर त्यात गुंतागुंत झाल्यानंतर तिला योग्य डॉक्‍टर कडे न पाठवता तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी संबंधित डॉक्‍टरांना शिक्षा सुनावण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.