स्वतःच्या निवृत्तीचा सखोल विचार केला आहे का? (भाग-२)

स्वतःच्या निवृत्तीचा सखोल विचार केला आहे का? (भाग-१)

निवृत्तीनंतर लागणाऱ्या निवृत्तीनिधीची वय वर्षे साठ पर्यंत किती आवश्यकता आहे. याचा नेमका अंदाज घ्या. वयाच्या साठाव्या वर्षी नेमका किती निवृत्ती निधी असायला हवा याची आकडेवारी काढताना अनेक महत्त्वाच्या बाबींचा आढावा घ्यावयास हवा. उदाहरणार्थ – जगण्याचे अपेक्षित वय, संपत्तीच्या नेमकी विभागणी, त्या संपत्ती व गुंतवणुकीतून निर्माण होणारे उत्पन्न व त्याचे मूल्य यांचा अपेक्षित दराने मिळणारा परतावा किती याचा नेमका विचार करणे आवश्यक आहे. सध्या वैद्यकीयशास्त्रातील प्रगतीमुळे माणसाचे जगण्याचे वय वाढत आहे याचा निवृत्ती निधी ठरवताना विचार केला पाहिजे. त्यामुळे ६० वर्षांनी निवृत्त झाल्यावरही जगणे ८० ते ९० वर्षापर्यंत जात आहे. यामुळेच ६० व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर पुढील तीस वर्षातील खर्चाची व उत्पन्नाची सोय करणे आवश्यक आहे. हे करत असताना आपल्या कमावत्या वयात निर्माण केलेली संपत्ती नेमकी कशी व कुठे गुंतवायची याचा आढावा अत्यंत आवश्यक आहे. साठवलेले पैसे कोणत्या गुंतवणूक साधनात ठेवल्याने त्याची भविष्यात मोठ्या संपत्तीमध्ये रुपांतर होऊ शकेल याचा विचार करा. कारण त्याचा निश्चितपणे निवृत्ती निधीवर परिणाम होत असतो.

वयाच्या साठाव्या वर्षी लागणारा निवृत्ती निधी जादा हवा असल्यास प्रत्येक तरुण –तरूणीने जास्तीत जास्त गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

निवृत्तीसाठी गुंतवणूक पर्यायाची योग्य निवड करा – निवृत्तीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ईपीएफ (एम्प्लॉयी प्रॉव्हिडन्ट फंड), पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड), एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम), बॉन्डस् (रोखे), पेन्शन योजना, इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, बँक डिपॉझिट, विमा पॉलिसी इत्यादी.

वयाच्या ६० व्या वर्षी १ कोटी रुपयांचा निवृत्ती फंड तयार करण्यासाठी प्रतिमाह इक्विटी म्युच्युअल फंडात नेमकी किती गुंतवणूक करावी हे वयाच्या नुसार पुढील तक्त्यात सुचवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.