झोपेच्या गोळ्यांचे सेवन करता का?; जाणून घ्या यामुळे होणाऱ्या समस्या

जर तुम्हाला खरोखर चांगली झोप हवी असेल आणि ती तुम्हाला मिळत नसेल, तरीही झोपेच्या गोळ्या हा त्यावरचा चांगला उपाय नक्‍कीच नाही. तरीही, झोपेच्या गोळ्या अधिक सुरक्षितपणे कशा घ्याव्यात, यासाठी थोडे सल्ले पुढीलप्रमाणे :

नैराश्‍य, थकवा, ऊर्जा कमी वाटणे, लक्ष केंद्रित करताना त्रास होणे, मूड नसणे
प्रचंड डोकेदुखी
पोटाचे (गॅस्ट्रोइन्टेस्टिनल) आजार (अतिसार, अन्नावरील वासना उडणे)
दीर्घकालीन गुंगी (ड्राऊझिनेस) (झोपेतच राहण्यासाठी मदत करणारी औषधे घेतल्याने असे होते.)

काही ठरावीक पदार्थाची ऍलर्जी येणे
झोपेतील वागणुकीत बदल होणे (पूर्ण जागे नसताना वाहन चालवणे, खाणे)
दिवसा स्मृतिभ्रंश होणे किंवा काम करताना अडचणी येणे.

काय काळजी घ्याल?
गरोदर महिला व स्तनपान करवणाऱ्या महिलांसाठी झोपेच्या गोळ्या असुरक्षित असतात.
या गोळ्यांमुळे रात्रीच्या वेळी पडण्याची शक्‍यता वाढते. प्रौढ/वयस्कर व्यक्‍ती गुंगीतच पडल्याने जखमा होण्याची भीती.
रक्‍तदाब कमी होणे, मूत्रपिंडाचे विकार, अनियमित हृदयाचे ठोके किंवा अन्य आजारपण
काही झोपेच्या गोळ्यांची नशा आल्याने व्यसनात रूपांतर होऊ शकते.
वैद्यकीय तपासणी करा…

झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्‍टरी सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे, बऱ्याचदा तपासण्यांतीच डॉक्‍टरांना आपल्या निद्रानाशाचे कारण समजू शकते.

झोपायला जाण्याच्या फार आधी गोळ्या घेऊ नका ः
दिवसभराची सर्व कामे पूर्ण करून, अंथरुणात झोपण्यासाठी जाईपर्यंत झोपेच्या गोळ्या घेऊ नका. तुम्हाला योग्य तितका वेळ झोप मिळू शकेल, अशाच वेळी झोपेच्या गोळ्या घ्या. तुम्हाला किमान 6 ते 8 तास झोप मिळू शकेल, याची खात्री असेल, तेव्हाच झोपेच्या गोळ्या घ्या. लहानशी डुलकी हवी असल्यास, झोपेच्या गोळ्या घेऊ नका.
दुष्परिणामांचा विचार करा
दिवसा आपण गुंगीत असल्यासारखे वाटले किंवा अन्य दुष्परिणामांची जाणीव झाली, तर गोळ्या, औषधे बदलण्यासाठी, कमी करताना डॉक्‍टरांशी संपर्क साधा.
अति मद्यपान टाळा :

झोपेच्या गोळ्या आणि मद्य कधीही एकत्र घेऊ नका, हे लक्षात असू द्या. अल्कोहोल किंवा मद्यामुळे गोळ्यांचा सेडेटिव्ह परिणाम वाढू शकतो. परिणामी, तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही विचलित होऊ शकता. हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास, श्‍वसनाचा आजार होऊ शकतो किंवा आपण बेशुद्ध पडू शकतो. अल्कोहोल सेवनामुळे खरेतर निद्रानाश बळावू शकतो. त्यामुळे अल्कोहोलसेवनाबाबत स्वत:स एक मर्यादा आखून घ्या.

डॉक्‍टरांनी दिल्यानुसारच झोपेच्या गोळ्या घ्या :
काही झोपेच्या गोळ्या अल्पकालीन वापरासाठीच असतात. डॉक्‍टरांना सांगितल्याशिवाय अधिक काळ ही औषधे घेऊ नयेत. सुरुवातीला डॉक्‍टरांनी सांगितल्यानुसार गोळ्या घेतल्यावर, आपल्या झोपेवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, तर डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय आणखी अतिरिक्‍त गोळ्या घेऊ नका.

डॉक्‍टरांनी सांगितल्यानुसार, गोळ्यांचे वेळापत्रक ठरवा. काही गोळ्या-औषधे कालांतराने बंद करायची असतात. आपल्याला थोडयाच काळापुरता, तात्पुरता निद्रानाशाचा आजार असू शकतो, हे समजून घेणे आवश्‍यक असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.