माहीत आहे का?

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या एकूण मतदारांची संख्या होती 81.5 कोटी. अमेरिकेतील मतदारांच्या चौपट मतदार भारतात आहेत. 2012 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदारांची संख्या होती 21.9 कोटी. अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, रशिया, बांगलादेश या पाच देशांच्या एकत्रित मतदारांपेक्षा भारतातील मतदार अधिक आहेत. 2009 पासून भारतीय मतदारांच्या संख्येत 9.7 कोटी एवढी वाढ झाली आहे.

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे 1952 मध्ये मतदारांची संख्या होती 17.3 कोटी. याचाच अर्थ 62 वर्षांत भारतातील मतदार जवळपास पाच पटीने वाढले आहेत. 81.5 कोटी मतदारांपैकी पुरुष मतदारांची संख्या आहे 42.7 कोटी तर महिला मतदारांची संख्या आहे 38.8 कोटी. 28,341 मतदार हे अन्य (तृतिय पंथी, समलिंगी आदी) म्हणून ओळखले जातील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)