लंडन: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या राहाणीमानाबाबत जगातील सर्वांनाच कुतूहल असते. महाराणी एलिझाबेथ ह्या जगातील सर्वात शक्तिशाली सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याविषयी साधी माहिती जाणून घेण्यासही लोक उत्सुक असतात त्यांच्या एका निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराणी एलिझाबेथ मोबाईलवर फक्त दोनच लोकांशी संपर्क साधतात.
या दोन लोकांना त्या फोन करतात किंवा ह्या दोन लोकांनी त्यांना फोन केला तर त्या फोनला त्या उत्तर देतात महाराणी एलिझाबेथ सोशल मीडियावर सक्रिय आहेत. पण मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधताना त्या या दोन व्यक्तींनाच प्राधान्य देतात बाकी कोणाचाही फोन त्या उचलत नाहीत, की बाकी कोणाला इतिहास महाराणी एलिझाबेथ यांची कन्या ऍनी आणि महाराणी एलिझाबेथ यांचे रेसिंग मॅनेजर वारेन क्वीन या दोन त्या व्यक्ती आहेत.
ज्यांच्याशी राणी एलिझाबेथ फक्त संपर्क साधतात महाराणी एलिझाबेथ सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन वापरत असून तो अंटी हॅकिंग तंत्रज्ञानाने समृद्ध आहे. म्हणजेच महाराणीचा हा मोबाईल फोन कोणीही हॅक करू शकत नाही. महाराणी एलिझाबेथ जगात कोठेही असल्या तरी या दोन व्यक्तींचा त्यांना फोन आला तर त्या त्वरित तो फोन उचलतात आणि संभाषण करतात.
एक आघाडीचे ब्रिटिश पत्रकार जोनाथन सॅकरड्युटी यांनी याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी याबाबत आणखीही काही मनोरंजक माहिती सांगितली आहे. महाराणी एलिझाबेथ यांना जगात कोठेही प्रवास करण्यासाठी पासपोर्टची गरज भासत नाही, तसेच ब्रिटनमध्ये कोठेही वाहन चालवण्यासाठी त्यांना ड्रायव्हिंग लायसनची गरज लागत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.