आरोग्य सल्ला : बहुगुणी लिंबाचे ‘हे’ फायदे माहिती आहेत काय?

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात लिंबू असतेच. लिंबूमधील अँटीबॅक्‍टरीअल आणि अँटी ऑक्‍सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करणे फायदेशीर ठरते. रोज लिंबू पाणी घेतल्याने फक्त वजन कमी होणार नाही, तर तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासून दूर रहाल.

श्वासाची दुर्गंधी होईल दूर – ब्रश केल्यानंतर ही तोंडातून वास येत असेल, तर मग रिकाम्या पोटी लिंबूपाणी घ्यावे. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होईल. कारण यात असलेल्या व्हिटॅमिन “सी’मुळे बॅक्‍टॅरीया नष्ट होतात.

पोटाचे आरोग्य राखले जाईल – रोज लिंबूपाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारण्याबरोबर लिंबू पाण्यामुळे ऍसिडिटी होत नाही.

मधूमेहावर गुणकारी – रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायड्रेट राहते व शरीराला ऊर्जाही मिळते.

वजन कमी करण्यासाठी – तुम्हाला जर वजन कमी कारायचे असेल, तर त्यावर सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्यातील लिंबू सरबत प्या. त्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून कमीत कमी 2 वेळा प्या. त्यामुळे भूक कमी लागेल आणि तुम्ही कमी खाल.
लिंबूच्या सालीत व्हिटॅमिन अ, सी, पोटॅशियम, क्‍याल्शिअम, फायबर यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

लिंबाच्या सालीत क्‍याल्शिअम आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. दुपारच्या जेवणानंतर लिंबू सरबत प्यायल्याने पचन शक्तीवर ताण येत नाही.
उन्हाळयात कोणतीही फळे किंवा सॅलड खाताना त्यात लिंबाचा समावेश नक्की करा.

डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.