तुम्हाला माहिती आहे का मोदींच्या खात्यात किती आहे पैसे?

नवी दिल्ली – आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणं आणि मुलाखती देताना पाहिलं आहे.  मात्र पहिल्यांदाच मोदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे.  या मुलाखतीत मोदींनी आपलं काम आणि खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.


या मुलाखतीत अक्षयने मोदींना त्यांच्या बँक खात्यातील जमा रक्कमेबाबत प्रश्न  विचारला की, ‘जेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री झालात त्यानंतर तुम्ही देशाचे पंतप्रधान झालात यावेळी तुमच्या खात्यात ऐकून उत्पन्न  २१ लाख रुपये होते ते तुम्ही तुमच्या स्टाफच्या मुलांनाच्या नावाने एफडी करून वाटून दिले मग आता सध्या तुमच्या खात्यात किती रक्कम आहे. यावर  मोदी म्हणाले,” जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्याकडे बँक खातं नव्हतं. आमदार होण्यापूर्वी माझं बॅंकेत खातं नव्हतं. जेव्हा आमदार झालो तेव्हा वेतन मिळू लागलं. हे वेतन मी शाळेत असताना देना बँकेचे कर्मचारी आले होते. त्यांनी सर्व मुलांना पैसे ठेवण्यासाठी गल्ले दिले होते आणि सांगितलं होतं की यामध्ये पैसे साठवून बँकेत जमा करा. पण तेव्हा पैसेच नव्हते. मात्र पुढे याच बँक खात्यात मला वेतन मिळू लागलं. या बँक खात्यात ऐकून २१ लाख रुपये आहे  हि रक्कम मी माझ्या स्टाफच्या मुलांच्या नावाने मदत म्हणून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.