माहीत आहे का?

गेल्या काही वर्षात देशाच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वेगाने वाढत चालले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांशिवाय केंद्रातील सत्ता काबीज करणे कोणत्याच राजकीय पक्षाला शक्‍य होईनासे झाले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्येही या पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये अलीकडील काळात झपाट्याने वाढ झाली असली तरी देशाच्या राजकारणात अकाली दल आणि द्रविड मुन्नेत्र कडगम (द्रमुक) हे केवळ दोन प्रादेशिक पक्ष सर्वाधिक वेळा रिंगणात उतरलेले दिसतात. 1962 च्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत पंजाबमध्येअकाली दलाला तीन जागांवर विजय मिळवता आला, तर द्रमुकने मद्रास (राज्य)मध्ये सात जागांवर विजय मिळवत प्रादेशिक पक्षांच्या यशाचा झेंडा रोवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.