मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. आर्यन खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आल्यापासून आर्यन खान चांगलाच प्रसिद्धी झोतात आहे. आधी प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहायचा आता मात्र अनेकदा तो मीडियालाही भाव देताना दिसत नाही. आर्यांच्या याच कारणामुळे सध्या सोशल मीडियावर नेटकरी त्याच्याविरोधात चांगलेच भडकले आहेत.
मीडियासमोरच्या त्याच्या वागण्यामुळे त्याला अनेकदा टार्गेट केले जाते. नुकतेच आर्यन खान एका ठिकाणी स्पॉट झाला, यादरम्यान पुन्हा एकदा आर्यन खानला त्याच्या या वृत्तीमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. याबाबतचा त्याच एक हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आर्यन कारमधून खाली उतरताना दिसत आहे. किंग खानचा लाडला खाली उतरताच मीडिया कर्मींनी ओरडून त्याला थांबण्याची विनंती केली. पण सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आर्यन पुढे निघून जात असल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
आर्यनच्या या वागण्याने तो पुन्हा एकदा सगळ्यांच्या निशाण्यावर आला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकजण आर्यनच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अनेकांनी कमेंटमधून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘हा स्वतःला शाहरुख समजतो का ?’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने ‘पप्पाचे पैसे खर्च करणे आणि पार्ट्यांमध्ये जाणे याशिवाय आर्यन भाई काय काम करतो? असा प्रश्न देखील विचारला आहे. तर आणखी एकाने हवेत जाऊन नको असा सल्ला त्याला दिला आहे.