पुणे – सलाड हा आजकालच्या जेवणाच्या मेनूतील एक अत्यावश्यक आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. सलाड हे नाव जरी नवीन वाटत असलं तरी तो पदार्थ मात्र प्रत्यक्षात तसा नवा नाही. नावामुळे हा नवीन वाटणारा पदार्थ अतिशय जुना आहे. तो आपल्या सर्वांच्या ओळखीचा आणि आवडीचाही आहे. आपली नेहमीची कोशिंबिर म्हणजेच ते सलाड! म्हणजे हे सलाड आपण पूर्वीपासून खात आलो आहोत.
पूर्वी होती ती दिनचर्या आता आपली कोणाचीच राहिली नाही. हल्ली आपले शारीरिक ताणताणाव प्रचंड वाढले आहेत. पूर्वी शरीर धाटणी हीच होती. आताही तीच आहे. पण भोवतालची परिस्थिती, दिनचर्या, आणि खाणेपिणे हे मात्र बदलत गेलंय. आता हा बदल त्याच शरीर धाटणीला पेलवत नाहीत, झेपत नाही आणि ते काही रोगांच्या (मूळव्याध, बद्धकोष्ठता ) स्वरूपात दिसू लागले आहेत.
हे शारीरिक त्रास होऊ नयेत म्हणून आपल्याला आपल्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांचे प्रमाण बदलायला हरकत नाही. म्हणून एखादा चमचा कोशिंबिरी ऐवजी आता वाटीभर सलाड खायला हवे. याचा आपल्या पोटाला चांगला उपयोग होतो.
हल्ली सलाड देखील इटालियन, मेक्सिकॅन अशी असतात. त्यात भाज्या जास्त आहेत आणि चीज वगैरेचे प्रमाण काही आहे हे असे पाहून हे प्रकार देखील खाऊन पाहायला हरकत नाही. पिझ्झा आणि मैदा प्रकार कायम खाणाऱ्या आपल्या युवा पिढीला ही सलाड खायला हरकत नाही.
कारण सतत पिझ्झा ब्रेड खाणाऱ्या या मंडळीना पोटासंदर्भात लवकर तक्रारी सुरू होऊ शकतील. मधुमेह, बीपी, मूळव्याध, थायरॉईड हे रोग खूप कमी वयात आले आहेतच. तर मग आपण जेवणात हे सलाड घेत जाऊ. गाजर, काकडी कांदा टोमाटो सलाड ची पाने, कोबी, आणि बऱ्याच भाज्या कच्चे मूग आणि लिंबू वापरून हा पदार्थ आपल्या आवडीनुसार बनवून पहा नी कसं वाटतय नक्की कळवा