शिवसैनिकांची राष्ट्रवादीवर केस ठोकायची हिमंत आहे का? -निलेश राणे

मुंबई: एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना दुसरीकडे राजकीय टीका टिप्पणी थांबत नसून भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. शिवसेना आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करेल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
समीत ठक्कर, युवकाने उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन म्हटले होते. गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. त्यानंतर ठक्कर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर या ३० वर्षीय युवकावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती.
दरम्यान या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जुन्या ट्विट चा हवाला देत. त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शिवसेना आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करेल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
NCP च्या official twitter handle वर ही पोस्ट आहे. बारक्याच्या खांद्यावर कोण बसलाय बघा… सांगा त्या शेमड्या शिवसैनिकाला NCP वर केस ठोकायला… आहे हिम्मत ??? pic.twitter.com/HCNXnyqrpI
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 16, 2020




