डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-३)

एकीकडे कोथिंबिर विकत घेताना दहा ठिकाणी चौकशी करतो, अशा स्थितीत घर खरेदी केवळ विकासकाच्या दाव्याने करणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेला, ऑफरला हुरळून जावून एखादी मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे बजेट जर आवाक्‍याबाहेर असेल तर अशावेळी आपली स्थिती शोचनिय होते.

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-१)

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-२)

हा धडा घ्या
वरील गोष्टी आणि कुंडली येथील रिअल इस्टेट बाजारातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात.
– जर आपल्याला स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर संबंधित प्रकल्पाची चाचपणी करा. जर आपल्या निकषावर गृहप्रकल्प उतरत असेल तरच खरेदीचा विचार करा.
– अन्य गुंतवणुकीप्रमाणेच घर खरेदी करताना गांभीर्याने विचार करायला हवा.
– घराच्या किंमती वाढतच जातील, असा विचार करू नका. कदाचित कालांतराने घराची किंमत घसरू देखील शकते. अशावेळी भूलथापांना बळी पडून घर खरेदीत अडकू नका.
– निर्माणाधिन निवासी प्रकल्पात फ्लॅट खरेदीच्या भानगडीत न पडणे श्रेयस्कर ठरेल.
– मालमत्ता खरेदीत गुंतवणूक करताना एकूण खर्चाचा विचार करा.

केवळ सॅम्पल फ्लॅटचे सौंदर्य आणि गुणवत्तेने प्रभावित न होता आणि भावनेच्या आहारी जावून खरेदीचा विचार करू नये. सॅम्पल फ्लॅटमध्ये प्रत्येक गोष्ट उत्तम वापरलेली असते. मग टाइल्स, विंडो ग्लास, किचन आदी. मात्र जोपर्यंत आपल्या हातात फ्लॅट येत नाही, तोपर्यंत कशाचीच खात्री देता येत नाही. फ्लॅटमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो, हे आपल्याला फ्लॅट हातात येईपर्यंत कळत नाही.

जर केवळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून फ्लॅट खरेदी करत असाल तर केवळ निवासी मालमत्तेचाच विचार करू नका. कमर्शियल भागातही गुंतवणुकीचा विचार करा. कारण तेथे मूल्य वृद्धीची शक्‍यता अधिक असते.

चकाचक सॅम्पल फ्लॅट
दहा वर्षापूर्वी निर्माणधिन योजनात घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना दाखविण्यासाठी सॅम्पल फ्लॅट तयार केले जात असे. हे फ्लॅट अत्यंत आकर्षक पद्धतीने सादर केलेले असायचे. लायटिंग, फर्निचर, फर्निशिंगपासून फिटिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट चकाचक दिसते. खोल्याही मोठ्या असतात. किचनमध्ये मॉड्यूलर फिटिंग्जचा समावेश असतो. हे पाहून कोणताही ग्राहक बुकिंगचा धनादेश दिल्याशिवाय राहत नाही.

विकासकांचे दावे
कोणताही विकासक हा गृहप्रकल्पाची जाहिरातबाजी करताना भविष्यात वाढणाऱ्या किंमतीचे आमिष दाखवत असतो. दिल्ली, मुंबई, पुणे असो उपनगर किंवा शहराजवळील भागात गृहकप्रकल्पाची विक्री करताना विकासक हा ग्राहकांना सरकारी योजनांची जंत्री सादर करतो किंवा त्याच्या पॉम्प्लेटमध्ये उल्लेख करतो. प्रस्तावित महामार्ग, रिंगरोड, मेट्रो स्टेशन, सायबर सिटी, मॉल, महाविद्यालय, शाळा, आयटी हब आदींचा समावेश असतो. तसेच शहरातील प्राइम लोकेशन गृहप्रकल्पापासून किती जवळ आहे, यासाठी मॅपदेखील सादर केला जातो आणि त्यातील अंतरही दिले जाते. यावरून आपल्यालाही प्रस्तावित गृहप्रकल्प हा शहराजवळच असल्याचा भास होतो. त्यामुळे आपणही हुरळून जावून कमी किमत असल्याने घराचे बुकिंग करतो. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. कुंडली येथे निवासी भागात किंमतीत फारशी वाढ झालेली नाही. मात्र कमर्शियल भागात गेल्या दहा वर्षात पाच पट वाढ झाली आहे. असे असले तरी बहुतांश लहान गुंतवणूकदार हे कमर्शियल व्यवहारापासून दूर राहतात आणि निवासी प्रकल्पातच गुंतवणूक करण्याबाबत रस घेतात.

– अपर्णा देवकर

Leave A Reply

Your email address will not be published.