डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-१)

एकीकडे कोथिंबिर विकत घेताना दहा ठिकाणी चौकशी करतो, अशा स्थितीत घर खरेदी केवळ विकासकाच्या दाव्याने करणे चुकीचे आहे. एखाद्या योजनेला, ऑफरला हुरळून जावून एखादी मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे बजेट जर आवाक्‍याबाहेर असेल तर अशावेळी आपली स्थिती शोचनिय होते.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही कधीही भावनेच्या आहारी जावून करू नये, असे सांगितले जाते. विकासकाने सादर केलेल्या सॅंम्पल फ्लॅटला हुरळून जावून किंवा त्याच्या आश्‍वासनाला बळी पडून मालमत्ता खरेदीचा विचार करू नये. मालमत्ता घेताना जेवढी खबरदारी घ्याल, त्या प्रमाणात आपले नुकसानीचे प्रमाण कमी राहील. यासाठी एक उदाहरण पाहु या. दिल्लीजवळच असलेल्या हरियानात कुंडली येथे दहा वर्षापूर्वी एका निर्माणधिन निवासी प्रकल्पात टू बीएचके फ्लॅटची किंमत 22 लाख रुपये होती. आज त्या हाऊसिंग सोसायटीत सुमारे अडीच हजारांहून अधिक फ्लॅट रिकामे आहेत. त्यातील निम्मे रिकामेच आहेत. सध्या फ्लॅटच्या किंमतीची विचारणा केली असता रेडी पझेशनचा फ्लॅट हा 30 लाखांत मिळत असल्याचे निदर्शनास आले. याचाच अर्थ गेल्या दहा वर्षात फ्लॅटची किंमत केवळ तीन टक्‍क्‍याने वाढली. ही वाढ बॅंकेत बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमीच आहे.

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-२)

डोन्ट ट्रस्ट ब्लाईंडली (भाग-३)

एवढेच नाही तर आपण महामार्गालगत किंवा निवासी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ टॉवरमध्ये टू बिएचके फ्लॅट खरेदी करू इच्छित असाल तर त्याची किमत रिसेल मार्केटमध्ये सुमारे 35 लाख आहे. अर्थात दहा वर्षात त्याची किमत पाच टक्‍क्‍याने वाढली आहे. याशिवाय टू-बिचएके फ्लॅटचे भाडे सरासरी 7 हजार रुपये दरमहा आहे. म्हणजेच मालमत्तेच्या किंमती प्रमाणात हे भाडे वार्षिक अडीच टक्के एवढेच आहे. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मालमत्ता खरेदी म्हणजे भाजी खरेदी नाही. मालमत्तेत आपण आयुष्यभराची पूंजी लावत असतो. एकीकडे कोथिंबिर विकत घेताना दहा ठिकाणी चौकशी करतो, अशा स्थितीत घर खरेदी केवळ विकासकाच्या दाव्याने करणे चुकीचे आहे.

– अपर्णा देवकर

Leave A Reply

Your email address will not be published.