विरोधी मंडळाचे उंबरे झिजविणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये ः फुंदे

नगर – शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीत तिकीट न दिल्याच्या पोटशूळातून गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्यावर आरोप करणाऱ्या विकास डावखरे यांनी गुरूमाऊली मंडळाला शहाणपण शिकवू नयेत. आधी त्यांचे गुरूमाऊली मंडळात योगदान काय ते सांगावे आणि मगच मंडळाचे अध्यक्ष तांबे यांच्याकडे हिशोब मागावा. तसेच विरोधी सर्व मंडळाचे उंबरे झिजवणाऱ्यांनी हिशोब मागू नये, अशी टिका गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फुंदे यांनी केली आहे.

गुरुमाऊली मंडळाची नुकतीच नगरमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत डावखरे यांच्यावर टिका करण्यात आली. फुंदे म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीत गुणवत्ता या मानांकनात डावखर न बसल्याने त्यांना गुरूमाऊली मंडळाकडून तिकीट नाकारण्यात आले. तेव्हापासून तांबे यांची बदनामी करण्याचा डावखरे यांचा उद्योग सुरू आहे. गुरूमाऊली मंडळ हे घटनात्मकरितीने स्थापन झालेले आहे. मंडळाच्या कामकाजात पारदर्शकतेला महत्त्व आहे.

मंडळ एकसंघ राहवेत, यासाठी तांबे यांचे योगदान मंडळाच्या सामान्य सभासदांना माहित आहे. मंडळ एकसंघ राहवे, यासाठी चुकीचे घडून देखील तांबे यांनी गप्प राहणे पसंत केले, तसेच माध्यमांकडे जाणे टाळले.मात्र, जिल्ह्यातील डावखरे यांच्यासारख्या दोन-चार भक्तामुळे मूळ विषय बाजूला पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच मीच किती प्रमाणिक, चांगला आणि पारदर्शक याचा आव काहींकडून करण्यात येत आहे. वास्तवात डावखरे यांचा बोलविता धनी वेगळाच आहे.डावखरे यांचा आतापर्यंत इतिहास पाहिला तर ज्याच्या घरात राहतो, त्याच्या विरोधात प्रचार केला असल्याचे अकोल्यातील सभासद विसरलेले नाहीत. शाळेतील सहकारी शिक्षकाबरोबर न पटणाऱ्या डावखरे यांनी तांबे यांच्यावर आरोप करणे यापेक्षा शिक्षक बॅंकेच्या राजकारणात दुसरा मोठा विनोद नाही, असे तापकीर यांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीला मुख्याध्यपक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अरूण आवारी, नगर पालिका शिक्षकांचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष किसन वराट, जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष रामेश्‍वर चोपडे, जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे, बाळासाहेब सरोदे, महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्यलता आढाव, राज्य संघाचे अध्यक्ष कैलास चिंधे, दत्ता कुलट, श्रीकृष्ण खेडकर, राजकुमार साळवे, सत्यवान मेहर, आर.के. ढेपले आदी उपस्थित होते.

शिक्षक बॅंकेची निवडणूक झाल्यावर लगेच झालेल्या मंडळाच्या आमसभेत (19 जून 2016) मंडळाच्या कार्यकारिणीने निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब सादर केला होता. मात्र, विरोध करण्यासाठी मुद्दा नसल्याने पुन्हा पुन्हा हिशोबाचा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. आम्हा सर्व उमेदवारांनी मंडळाकडे जमा केलेल्या रक्कमेचा हिशोब आम्हाला मिळालेला आहे. यामुळे अन्य कोणी मध्ये लूडबूड करू नयेत. असे महिला आघाडीच्या अध्यक्षा व बॅंकेच्या संचालिका विद्यलता आढाव यांनी स्पष्ट केले.

पारदर्शी कारभाराच्या मुद्‌द्‌यावर गुरूमाऊली मंडळाने शिक्षक बॅंकेची निवडणूक लढविली. मी विकास मंडळाच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष आहे. मला देखील विश्‍वासात घेतले जात नाही. विकास मंडळाचा निर्णय आमसेभेत घेवू असे म्हणणारे कोणाला न विचारता एकटे निर्णय घेत असल्याने संशय वाढला आहे. या कामाचे ई टेंडर का काढले नाही तसेच निविदा सर्वांसमोर का ओपन केली नाही, असे आव्हान विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष मोहन पागिरे यांनी दिले. ज्या हेतूने गुरूमाऊली मंडळाची निर्मिती झाली, तो हेतूच आता बाजूला पडलेला दिसत आहे. त्यामुळे गुरुमाऊली मंडळाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर आमसभा घेण्यात येईल, असे मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.