या वयात उघड्या मांड्या बघायची वेळ आणू नका – शरद पवार

शरद पवार यांची विजयसिंह मोहिते पाटिल यांच्यावर टीका

सोलापूर – विजयदादा यांनी हाफ पॅंट, काळी टोपी घातलेले पहायची वेळ येऊ नये. राष्ट्रवादी सोडली नाही म्हणता, पण कुठल्या ही पक्षात जा, पण हाफ पॅंट घालू नका. माझी विनंती आहे.विजयदादानी या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ जनतेवर आणि माझ्यावर आणू नये. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. लक्ष्मण जगताप आमच्या सोबत होता. आमदार झाला पक्ष सोडला नंतर भाजपात गेले. एकदा त्यांचा फोटो संघाच्या पोस्टरवर हाफ पॅंट, काळी टोपी घातलेला आला. जगतापाची ही अवस्था झाली.आता मला विजयदादांची काळजी आहे असे पवार म्हणाले. माढा लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा नातेपुते ता. माळशिरस येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

माळशिरसमध्ये बोलण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. विजयदादाचा साखर धंद्याचा संबध होता का नव्हता? असे सांगत पवार पुढे म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यानी हातभार लावला. मोहितेना मदत केली. जुन्या सहकार्याबद्दल मी वाईट बोलत नाही. मोहिते यांच्या पतसंस्थातील लोकांचे पैसे बुडले ते लोक माझ्याकडे आले. पण मी व्यक्तिगत आकस करत नाही. आता मी माळशिरस तालुक्‍याची जबाबदारी घेतली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते यांना आव्हान दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.