चंडीगढ -खातेबदलाचा बहुधा आधीच सुगावा लागला असल्याने सिद्धू यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले. मंत्रिमंडळ फेरबदल होण्याआधी त्यांनी मला लक्ष्य केले जात असल्याच्या शब्दांत नाराजी व्यक्त केली.
माझ्या खात्यावर जाहीरपणे निशाणा साधला जात आहे. सामूहिक जबाबदारी गेली कुठे? मला गृहीत धरले जाऊ शकत नाही. माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत मी क्रिकेटपटू, समालोचक, टीव्ही शो या माध्यमांमधून परफॉर्मर ही भूमिका निभावली आहे. ज्येष्ठ या नात्याने अमरिंदर यांचे मी नेहमीच ऐकत आलो. त्यांनी मला बोलावून काय ते बोलायला हवे होते.
मात्र, सामूहिक जबाबदारी बाजूला सोडून मला लक्ष्य करण्यात आले, असे सिद्धू येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.