नागपूर : बदलापूर सारख्या कोणत्याही घटनांचे कोणीही राजकारण करू नये. बदलापूरची अतिशय वेदना देणारी घटना आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे विशेष करुन अशा घटनेचे कोणीही राजकारण करू नये. अशा घटना करणाऱ्याला कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका महिलेला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती. मात्र, तेव्हा त्याचे राजकारण कोणीही केले नाही. अशा घटनेचे राजकारण करून त्या घटनेतील गांभीर्यता कमी होते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला.
यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असतानाही विद्यार्थ्यांची आंदोलने झाली. मग तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? मग तेव्हा शरद पवार मैदानात उतरले नाहीत. मात्र, आता निवडणुका आहेत तर लगेच मैदानात उतरणार म्हणतात, अशी टीका त्यांनी केली.