सावधान! पार्किंग शुल्क घेतल्यास होऊ शकतो खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे – सध्या शहरात मॉलची संख्या वाढली आहे त्यामुळे अनके लोक खरेदीसाठी मॉलमध्ये येतात. मात्र आपली गाडी पार्किंग करण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. याला आता लगाम बसणार आहे. पुणे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये आत फ्री पार्किंग असणार आहे.

दरम्यान, आता मल्टिप्लेक्स, मॉल्स येथे पार्किंग शुल्क घेतल्यास महापालिका खंडणी चा गुन्हा दाखल करू शकते. अशी माहिती महापालिका शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली आहे. तसेच पार्किंग शुल्क देऊ नका असे आवाहन देखील बालवडकर यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.