नाणार प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर लाथ मारू नका! 

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन 

मुंबई – नाणार प्रकल्प रद्द करणार या अटीवर भाजपाशी शिवसेनेने युती केली असतानाच आता हा प्रकल्प रद्द करू नका, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कोकणात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारने रिफायनरी प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर मारू नये, असे आवाहन भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजापूर तालुक्‍यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या तीन लाख कोटी रूपये गुंतवणुकीच्या रिफायनरी प्रकल्पावरून अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. भाजपने शिवसेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची अट मान्य केल्याचे बोलले जाते. यापाश्वभूमीवर प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द न करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे जठार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळाने नाणार प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारने नाणार प्रकल्पाबाबत सद्‌सद्विवेकबुध्दीने विचार करावा, असे विनंतीही शिष्टमंडळाने केली. त्यानंतर प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प हा कुणाचा विरोध आहे म्हणून रद्द करणार नाही. तसेच प्रकल्प रद्द करण्यासाठी आपल्यावर कुणाचाही दबाव नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असून नाणार प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या पर्यावरण विभागाच्या परवानग्या अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे जठार यांनी सांगितले.

नाणार प्रकल्पाला स्थानिक मूळ मालकांचा विरोध नाही, तर गेल्या अनेक पिढ्यांनपिढ्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, असे जठार यांनी सांगितले. सरकारला हा प्रकल्प रद्द करायचा असेल तर जनमत घ्या, समृद्धी महामार्गाप्रमाणे पॅकेज जाहिर करा… त्यानंतरही या प्रकल्पाला विरोध झाल्यास तो रद्द करावा, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

शिवसेना मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नाणार रिफायनीचे समर्थन करणारे शिष्टमंडळ विधानभवनात येणार असल्याची माहिती समजल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी याच अधिवेशनात नाणारची अधिसूचना रद्द होणार असल्याचा दावा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)