नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक अपर पोलीस आयुक्तांच्या सूचना
पुणे – संचारबंदीत रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या खासगी क्लिनिकमध्ये जाणाऱ्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीमध्ये अडवून ठेवू नका. डॉक्टरांचे ओळखपत्र पाहावे, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबंधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडावे, अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून आपली क्लिनिक बंद ठेवली आहेत. त्यामुळे इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यावर ठेवावेत. तर काही डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयात येऊन इतर रुग्ण तपासावेत, असे आवाहन पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले होते. त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेत, गेल्या दोन दिवसांपासून आपली क्लिनिक सुरू केली आहेत. तर काही पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यासाठी येत आहेत. पण,
क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या स्टाफला देखील यावे लागते. मात्र, संचारबंदीमुळे डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ओळखपत्र पाहूनदेखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सोडले जात नाही. धायरी येथे पोलीस कर्मचाऱ्याने डॉक्टरांनी कर्मचाऱ्याला दिलेले पत्रच फाडल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्त यांच्याकडे आल्या होत्या. त्यावर हे आदेश देण्यात आले आहेत.