चीनला जाऊ नका – अमेरिकेची आपल्या नागरीकांना सुचना

वॉशिंग्टन – कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे अखेर अमेरिकेने आपल्या नागरीकांना चीनला जाऊ नका असा जाहीर इशारा दिला आहे. काल सायंकाळी त्यांनी ही सुचना जारी केली आहे. त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याची लेव्हल चारची आहे. हा अतिगंभीर स्वरूपाचा इशारा मानला जातो. चीन मधे असलेल्या अमेरिकन नागरीकांनी शक्‍य तितक्‍या लवकर तेथून बाहेर पडावे अशी सुचनाही अमेरिकेने केली आहे. चीन मधील हा प्रादुर्भाव म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणिबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही जाहीर केले आहे. त्याचा दाखलाही अमेरिकेने दिला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य संघटनेने सुरूवातीला या रोगाच्या प्रसाराविषयीच्या शंका फारशा गांभीर्याने घेतलेल्या नव्हत्या. पण त्यांनी नंतर याच्या धोक्‍याचा आढावा घेऊन नागरीकांना या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरीच्या सुचना दिल्या आहेत. खुद्द अमेरिकेत कोरोना व्हायरसचा रूग्ण आढळून आल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणांमध्ये मोठीच खळबळ उडाली आहे. शिकागोतील या इसमाला त्याच्या चीन मधून आलेल्या पत्नीशी झालेल्या संपर्कातून या व्हायरसची लागण झाली आहे.

बुधवारपासूनच अमेरिकेतील विमान कंपन्यांनी आपली चीन कडे जाणारी विमाने रद्द करण्यास प्रारंभ केला असून गुरूवारपासून तर जवळपास सारीच विमान सेवा बंद करण्यात आली आहे. चीनला गेलेल्या जवळपास सहा हजार पर्यटकांना सध्या इटालिच्या एका बंदरावर संरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आले आहे.चीनच्या वुहान प्रांतात हजारो विदेशी नागरीक अडकून पडले असून त्यांना तेथून बाहेर पडण्यावर चीन सरकारनेच बंदी घातली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.