बीड – लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे उमेदवारांनामध्ये विरोधी पक्ष नेते उमेदवारांचा जोश वाढविताना दिसून येत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे तसेच उमेदवारांचा कवितेच्या माध्यमातून जोश वाढविताना दिसून येत आहे.
‘बस्स तू चलना मत छोडना… बस्स तू लढना मत छोडना…’ या कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंनी सोनवणे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कविता खुद्द धनंजय मुंडे यांनाही लागू पडते का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.