नवी दिल्ली – वृत्तसमूह असणाऱ्या न्यूज लॉंड्रीवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या “सर्व्हे’च्या कारवाईत जप्त केलेला डेटा लीक करू नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. या न्यूज पोर्टलचे सहसंस्थापक अभिनंदन सेखरी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
प्राप्तिकर विभागाला न्या. मनमोहन आणि नवीन चावला यांनी हा डाटा लीक होणार याची आपण काळजी घ्यावी, असे आदेश दिले. ते कोणाचाही डाटा लीक करू शकत नाहीत, कारण दुसऱ्या बाजूला माध्यमे आहेत. साधारणपणे कोणाचाही डाटा असा लीक केला जात नाही. ते नैतिक आणि तत्त्विकदृष्ट्या चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सेखरी यांच्या मॅकबुक आणि फोनमधून हा डाटा जप्त करण्यात आला होता.
जप्त केलेल्या डाटाचे खुले प्रदर्शन करताना आम्ही पाहतो. आम्हाला ते चॅनेलवर दिसते. हे घडता कामा नये, असे न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला बजावले आहे. सेखरी हे पत्रकार असूनही त्यांनी गृहितावर आधारित ही याचिका केली असल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला.