परिस्थितीचा आढावा न घेता काश्‍मीरविषयी भाष्य करू नका

तुर्कीसोबत मलेशिया सरकारचे भारताने कान टोचल

नवी दिल्ली : काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा न घेता यासंदर्भात कोणतेही भाष्य करु नये, असे परराष्ट्रमंत्रांलयाचे सचिव रविश कुमार यांनी दोन्ही राष्ट्रांना सुनावले. संयुक्त राष्ट्र महासभेत काश्‍मीर मुद्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तुर्कीसोबत मलेशिया सरकारचे भारताने कान टोचले आहेत.

मलेशियाने काश्‍मीरसंबंधी केलेल्या टिप्पणीवरही त्यांनी यावेळी आक्षेप घेत दोन्ही देशांना चांगलेच खडसावले आहे. जम्मू काश्‍मीरने देशातील अन्य राज्याप्रमाणे इंस्ट्रूमेंट ऑफ एक्‍सेशनवर स्वाक्षरी केली आहे. मात्र पाकिस्ताननेच अवैधरित्या जम्मू काश्‍मीरच्या काही भागात घुसखोरी करुन ताबा मिळवला आहे. हे सर्व लक्षात ठेवून आणि मलेशियाने दोन्ही राष्ट्रांतील संबंधाचा विचार करुनच एखादे विधान करावे, असे भारताने म्हटले आहे.

यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही समाचार घेतला. सीमारेषेच्या दिशेने मोर्चा वळवण्याची भाषा करणाऱ्या इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय राजकारणच कळत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध कसे जोपासायचे हे समजून घेण्याची त्यांची क्षमता नाही. भारताविरुद्ध जिहादची भाषा वापरणे अतिशय गंभीर असून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे रविश कुमार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.