माहिती नसताना कुठल्याही पोस्टवर प्रतिक्रिया देऊ नका – सारा श्रवण

‘मी माझ्या घरी सुखरूप आहे’

मुंबई – अभिनेता सुभाष यादव याच्यावार कास्टिंग काऊच आणि विनयभंगाचे आरोप करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी मराठी अभिनेत्री ‘सारा श्रवण’ हिला अटक केली होती.

दरम्यान, आज साराने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. यावेळी साराने माहिती नसताना कुठल्याही बातम्यांवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका असे आवाहन केले.

फेसबुक लाईव्हमध्ये सारा म्हणाली कि, “मी माझ्या घरी सुखरूप आहे, गेल्या काही दिवसांत माझ्याबाबतीत ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या आहेत त्याची खातरजमा न करता तुम्ही कुठल्याही पोस्टवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, त्यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत आहे. आणि मी माझ्या पाच वर्षांच्या बाळाकडे देखील नीट लक्ष देउ शकत नाही.

आधी तुम्ही सर्व गोष्टींची योग्य ती माहिती घ्या आणि त्यानंतरच आपले मत व्यक्त करा. मी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी आजही खंबीरपणे उभी आहे. जे काही खरे खोटे असेल ते न्यायालयाच्या निर्णयातून कळेल. कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे”. असे यावेळी साराने म्हंटले आहे.

सुभाष यादव याने दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात साराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.