तालुक्‍याची घडी मोडू नका ः संजीवराजे

दुधेबावी – तालुक्‍याची घडी आपण चांगली बसवलेली आहे. ती मोडू नका. बाहेरचा उमेदवार जरी खासदार झाला तरी काळजी करू नका आम्ही तुम्हाला नेहमी मदत करु. त्यासाठी आपण भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून तुम्ही विचार बदलू नका नाहीतर तालुक्‍याची बसलेली घडी बदलायला वेळ लागणार नाही. चांगल्या मताने संजयमामा शिंदे यांना निवडून द्यावे अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केली. दुधेबावी ता. फलटण येथे माढा लोकसभा निवडणूक आघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. आमदार दिपक चव्हाण, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. भावना सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बबलू निंबाळकर, शिवाजी सोनवलकर, विकास सोनवलकर, दशरथ दडस, भानुदास दडस, संपत दडस, सुखदेव सोनवलकर, बाबुराव नाळे, युवा नेते प्रशांत नाळे, अमोल नाळे, श्रीमंत नाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार दिपक चव्हाण म्हणाले, भविष्य ठरवण्याची ही निवडणूक आहे. धोम बलकवडीचे पाणी आणण्यासाठी श्रीमंत रामराजे यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे.तालुक्‍यातील उमेदवार असल्याने सर्वाना विचार करून निर्णय घ्यावा लागेल. नवीन पिढीला संघर्ष करावा लागेल. तालुका शांतपणे सुरू राहण्या साठी आपल्याला संजयमामा शिंदे यांना निवडून द्यावे लागेल.यावेळी माणिकराव सोनवलकर, सचिन रणवरे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय सोनवलकर यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.