पुणे – गोंधळ करू नको असे म्हणाल्याच्या रागातून एकावर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
सूरज शिवाजी शिंदे (रा. पर्वती पायथा) असे अटक झालेल्याचे नाव आहे. याबाबत बाळू पवार (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे. 11 मार्च रोजी पर्वती पायथा परिसरात ही घटना घडली. पवार यांच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानाजवळ गोंधळ सुरू होता. त्यावेळी पवार यांनी शिंदे याला गोंधळ करू नको, असे सांगितले.
त्याच रागातून शिंदे याने पवार यांच्या मानेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिंदे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.