लॉकडाऊन कराच : पुणे महापालिका, पोलिसांची भूमिका

पुणे : करोना बाधितांची वाढती संख्या तसेच उपलब्ध बेडची संख्या पाहता लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याची भूमिका पालिका प्रशासन आणि पोलिसांनी मांडली. तर लोकप्रतिनिधींना यास विरोध केला. सात अथवा 14 दिवसांचा लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. यामुळे काही फरक पडणार नाही. तसेच अर्थचक्र ठप्प होईल. त्यामुळे लॉकडाऊन करू नका, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली.

लॉकडाऊनऐवजी निर्बंध अधिक कडक करा, असाच सूर उपस्थित लोकप्रतिनिधींचा होता. याविषयी विधानभवन येथे तीन तास चर्चा झाली. आणि चर्चेअंती लॉकडाऊनचा निर्णय टळला.करोना रुग्णांची संख्या अशीच राहिल्यास बेड मिळणे अशक्‍य होईल.

त्यामुळे आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच करोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याचे पालिका प्रशासनाकडून याबैठकीत सांगण्यात आले. तर पोलिसांनी संचारबंदी लागू करणे आवश्‍यक असल्याची भूमिका मांडली. लोकांना आता गांभीर्य राहिले नाही.

अनावश्‍यक फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पोलीस तरी किती वेळा आणि किती ठिकाणी फिरणार यालादेखील मर्यादा आहेत, असे म्हणणे प्रशासनाकडून मांडण्यात आले. तर लोकप्रतिनिधींनी हॉटेल व बसमध्ये मास्कबरोबरच फेसशिल्डचा वापर बंधनकारक करण्याचे मत मांडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.