आळंदी – महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक 5 वी व पूर्व माध्यमिक 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
इयत्ता 5 वी मध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता 5 वी चा 56.66% निकाल लागला. यात सोमेश्वर हरिभाऊ ढाकरगे (254/300), अनुष्का हनुमंत तापकिर (244/300), हरिओम रामकृष्ण जायभाये (232/300), विष्णू सुखदेव बनसोडे (220/300), गोरक्ष सुरेश राख (204/300), यश किसन टोलते (198/300), संजीवनी भिमराव गायकवाड (196/300) विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
तसेच इयत्ता 8 वी एकूण 26 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता 8 वी चा 26.92% निकाल लागला असून यामध्ये अपूर्वा हनुमंत तापकिर (246/300), वेदांत रवींद्र भालेराव (220/300), कृष्णा भाऊसाहेब खैरे (216/300), प्रसन्ना विष्णुपंत सर्जे (198/300), सृष्टी जीवन पांचाळ (198/300), साईप्रसाद अशोक कवडीकर (196/300), राजनंदनी संतोष सोळंके (160/300) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच गुणवत्ता विभागाचे व विद्यालयाचे पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, इयत्ता 5 वी च्या समन्वयक व मार्गदर्शक पौर्णिमा मोरे तसेच छाया कुऱ्हाडे, योगेश मठपती, संदीप वालकोळी व इयत्ता 8 वी च्या समन्वयक मनीषा कहडने, प्रमोद कुलकर्णी, नारायण पिंगळे तसेच मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष सचिव अजित वडगावकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करून कौतुक केले.