नवी दिल्ली –तामीळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकचे खासदार गौतम सिगमानी यांची तब्बल 8.6 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परकी चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) भंगाबद्दल सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) ती कारवाई करण्यात आली.
सिगमानी यांनी 2008 मध्ये परदेशांत गुंतवणूक केली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेची (आरबीआय) मंजुरी न घेता त्यांनी संबंधित व्यवहार केले. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली. आता सिगमानी यांच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.
त्याअंतर्गत सिगमानी यांची शेतजमीन, व्यावसायिक आणि निवासी इमारती, बॅंक ठेवी आणि समभागांवर टाच आणली गेली आहे. सिगमानी मागील वर्षीच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच लोकसभेवर निवडून गेले आहेत.