चेन्नई – देशभरात करोना व्हायरसचे थैमान चालू आहे. अशातच तामिळनाडूमध्ये करोनामुळे एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. आज त्यांचा ६२ वा वाढदिवस होता.
Tamil Nadu: DMK MLA J Anbazhagan who was suffering from COVID19 passes away at a private hospital in Chennai pic.twitter.com/g0LQMNw0v3
— ANI (@ANI) June 10, 2020
माहितीनुसार, जे अनबालागन यांना ३ जून रोजी करोनाची लक्षणे जाणवू लागली. करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र, अनबालागन यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली. याआधी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. पण, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. कोरोनामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे.