पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षण ऑक्टोबर अखेर घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे 5 महिने परीक्षा लांबणीवर पडली.
प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा 4 ते 12 जून या कालावधीत घेण्याबाबतचे वेळापत्रक परीक्षा परिषदेने जानेवारी 2020 मध्येच जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली. सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज नोंदणी केली.
करोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला होता. मात्र, त्या कधी होणार? असा प्रश्न डी.एल.एड.चे अद्यापक विद्यालय, विद्यार्थी यांच्याकडून उपस्थित होत आहे. त्यानुसार ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात परीक्षा घेण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी शासनाकडे पाठवला आहे. शासन मान्यता मिळाल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.