#CWC19 : भारतीय संघात दोन बदल, ‘या’ दोन खेळाडूंचे संघात पुनरागमन

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान बळकट करण्यासाठी भारताची बांगलादेशविरूद्ध आज कसोटी ठरणार आहे. दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. या दृष्टीनेच भारतीय संघात काही बदल होणे अपेक्षित मानले जात होते.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्हीही संघाने आपल्या संघात बदल केलेले आहेत. भारतीय संघाने केदार जाधव आणि कुलदीप यादव यांच्याजागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संघात स्थान दिले आहे. तर दुखापतग्रस्त विजय शंकरच्या बदली ऋषभ पंत संघात कायम आहे.

दुसरीकडे बंगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. महमदुल्लाह आणि मेहंदी हसन मिर्झा यांच्याऐवजी सब्बीर रहमान आणि रूबेल हुसैन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

बांगलादेश संघ – तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, लिटन दास, मोसद्दक हुसैन, सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मशरफे मोर्तज़ा, रूबेल हुसैन, मुस्तफ़िज़ुर रहमान

दरम्यान, भारताने आतापर्यंत बांगलादेशविरूद्ध 36 सामन्यांपैकी 29 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांना बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साहजिकच बांगलादेशचे खेळाडू येथे चांगली झुंज देतील असा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.