सिनसिनाटी टेनिस स्पर्धा : जोकोविच अंतिम फेरीत

सिनसिनाटी – अग्रमानांकित नोवाक जोकोविचला सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याच्याशी गाठ पडणार आहे. महिलांमध्ये विजेतेपदासाठी स्वेतलाना कुझ्नेत्सोवा व मेडिसन केईज यांच्यात लढत होणार आहे.

जोकोविचला उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिली मेदवेदेवने चिवट झुंज दिली. पहिला सेट गमाविल्यानंतर सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवित जोकोविचने विजयश्री खेचून आणली. त्याने हा सामना 3-6, 6-3, 6-3 असा विजय मिळविला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा कल्पकतेने उपयोग केला. तसेच त्याने प्लेसिंगचा उपयोग केला. या सामन्याच्या तुलनेत गॉफीनला सरळ दोन सेट्‌समध्ये विजय मिळाला. त्याने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटला 6-3, 6-4 असे हरविले. त्याने जमिनीलगत परतीचे अप्रतिम फटके मारले.

महिलांच्या उपांत्य फेरीत कुझ्नेत्सोवाने अग्रमानांकित ऍशलीघ बर्टीवर 6-2, 6-4 असा विजय मिळविला. तिने अचूक सर्व्हिस व खोलवर परतीचे फटके असा खेळ केला. अन्य सामन्यात मेडिसनने सोफिया केनिनचे आव्हान 7-5, 6-4 असे संघर्षपूर्ण लढतीनंतर संपुष्टात आणले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×