डिजे, गुलालमुक्‍त गणेशोत्सव साजरा करा

आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुजावर यांचे आवाहन

आळेफाटा- गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करुन डिजे व गुलालमुक्‍त गणेशोत्सव साजरा करावा हा उत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांनी दिलेल्या आचारसंहीतेचे पालन करावे, ज्या मंडळांकडून पालन केले जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अस इशारा आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिला.

आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा व सुव्यवस्था नियोजन गणेश मंडळांसाठी आचारसंहीता गणेश मंडळांनी करायच्या कायदेशीर बाबींची पूर्तता या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी मुजावर बोलत होते. याप्रसंगी आळेफाटा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक गभाले, राहूल गोंदे, सर्व पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

नारायणगावचे पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील म्हणाले की, डिजे व गुलाल मुक्त मंडळ व शांतताप्रिय मंडळ या पद्धतीने जर आपण गणेशोत्सव साजरा केला तर ती पोलिसांना एक प्रकारे चांगली मदत होणार आहे. ओतूरचे पोलीस निरीक्षक रमेश खुने म्हणाले की, एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविल्यास खर्चाची बचत होईल व त्या माध्यमातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपणच आपल्या गावाचे संरक्षण करु शकतो व आपल्या गावच्या विकासाला हातभार लावू शकतो असे नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×