दीया मिर्झा अडकणार पून्हा एकदा लग्न बेडीत; ‘वैभव रेखी’च्या गळ्यात टाकणार वरमाला

बॉलीवूड इंडस्ट्रीत सध्या अनेक जण विवाहबंधनात अडकत आहेत. याचदरम्यान अभिनेत्री दीया मिर्झाच्याही लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. दीया मिर्झा ही उद्योगपती वैभव रेखी यांच्यासोबत सात फेरे घेणार असल्याची चर्चा आहे.

दीया मिर्झा आणि वैभव रेखी हे 15 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्यात दोन्ही कुटुंबियांसह काही खास मित्र सहभागी होणार आहेत. लॉकडाउनच्या काळात दीया मिर्झा आणि वैभव रेखी यांच्यातील जवळीकता वाढली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, वैभव आणि प्रसिद्ध योगा इंस्ट्रक्‍टर सुनैना रेखी यांचा पहिला विवाह झाला होता.

मात्र, त्यांनी विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगी देखील आहे. दुसरीकडे दीया मिर्झाने 18 ऑक्‍टोबर 2014मध्ये उद्योगपती साहिल संघा यांच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर ऑगस्ट-2019मध्ये हे दोघेही विभक्‍त झाले होते.

आता दीया मिर्झा आणि वैभव रेखी हे पुन्हा नव्याने सुरूवात करणार आहेत. या दोघांनाही सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.