दिव्यांगास दिली रमजान ईद निमित्त सायकल भेट

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडविणारा उपक्रम

नगर  – वाढदिवस म्हटले की गाजावाजा व सेलिब्रेशन, मात्र या साऱ्या गोष्टींना फाटा देत स्वत: दिव्यांग असल्याची जाणीव ठेवून संजय पुंड यांनी दोन्ही पायांनी अपंग असलेल्या ईस्माइल सय्यद यांना तीनचाकी सायकल देऊन ईदची आगळीवेगळी भेट दिली. हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांचे मन भारावले.

ईस्माइल सय्यद यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, दोन्ही पायांनी अपंग असल्याने दारिद्य्र पाचवीला पुजलेले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नगर तालुका उपाध्यक्ष असलेले संजय पुंड यांनी आपल्या वाढदिवसाच्या सर्व खर्चाला फाटा देत, आपले बंधू समान असलेले ईस्माइल सय्यद यांना रमजान ईदच्या पार्श्‍वभुमीवर सायकल भेट देऊन जगण्याची एक नवी उमेद दिली.

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक ऐक्‍य जपणारा हा कार्यक्रम पार पडला. सायकलची भेट स्वीकारताना ईस्माइलचे डोळे पाणावले. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. लक्ष्मण पोकळे, किशोर सूर्यवंशी, कार्याध्यक्ष हमिद शेख, अमोल चांदणे, कांतीलाल जाडकर, वाहतूक पोलीस कृष्णा सोनवणे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.