नवी दिल्ली – आज संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू- काश्मीर मध्ये दाखल झाले आहेत. यंदा मोदींनी भारतीय जवानांबरोबर दिवाळी साजरी केली.
यावेळी जवानांना मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबर त्यांच्यासोबत काही वेळही घालवला.जम्मू- काश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.
Jammu and Kashmir: Prime Minister Narendra Modi celebrated #Diwali in Rajouri district with Army personnel, today. pic.twitter.com/PyQZeQO2L1
— ANI (@ANI) October 27, 2019
दरम्यान, यापूर्वी देखील पंतप्रधान मोदींनी 2018 मध्ये उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेवर बर्फाळ प्रदेशात लष्कर आणि इंडो-तिबेटिअन सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
तर 2014 मध्ये पहिल्यांदा पतंप्रधान बनल्यानंतर मोदींनी जवानांसोबत सियाचीनमध्ये दिवाळी साजरी केली होती.