ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये गुरूवारी साजरी करणार दिवाळी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या गुरूवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये अधिकृतरित्या दिवाळी साजरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ट्रम्प यांची यंदाची ही व्हाईट हाऊस मधील तिसरी दिवाळी असणार आहे. बराक ओबामा यांनी सन 2009 मध्ये ही प्रथा सुरू केली होती.

दिवा प्रज्वलित करून ते पारंपारीक पद्धतीने दिपोत्सव साजरा करतील. या सेलिब्रेशनचे अन्य तपशील अद्याप जाहींर करण्यात आलेले नाहीत. साधारणपणे व्हाईट हाऊसमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्यावेळी अमेरिकेतील काही भारतीय नागरीकांना तेथे आमंत्रित केले जाते. दिवे प्रज्वलीत केले जातात, हिंदु प्रार्थनाही होते आणि नंतर चहापानाचा कार्यक्रम होतो असा तेथील दिवाळीचा सरंजाम असतो.

गेल्या वर्षी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील रूझवेल्ट रूम मध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी भारताचे तेथील राजदूत नवतेज सरना यांना आमंत्रित केले होते. दरम्यान अमेरिकेत दिवाळी साजरी करण्यास अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. टेक्‍सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अबोट्ट यांनी शनिवारी अमेरिकन भारतीय नागरीकांच्या समवेत दिवाळी साजरी केली. तेथील स्वामी नारायण मंदिरात आम्ही यंदा दिवाळी साजरी करीत आहोत असे रिपब्लीकन कॉंग्रेसमन पेटे ओल्सन यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.