वाघोली (प्रतिनिधी) : दिव्यांच्या साक्षीने तेजोमय होणारा दीपावली हा सण विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असून विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा खरा उत्सव असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
गेल्या दोन वर्षापासून लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव घ्यावा लागला पण याच काळात विद्यार्थ्यांचे पालक व इतर मार्गदर्शकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना तसेच कलागुणांना मोठ्या प्रमाणात वाव मिळाला असून
दीपावली निमित्त आकाश कंदील बनवणे, किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवणे आदी कामे विद्यार्थी मन लावून करत असून यातून विद्यार्थ्यांचे कला कौशल्य विकसित होत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोली तालुका हवेली येथील डोमखेल रोड येथील हनुमंत कड व राजेंद्र घुले यांच्या कुटुंबियातील लहान मुलांनी मुरुड जंजिरा या किल्ल्याची अप्रतिम अशी भव्य प्रतिकृती साकारली आहे.अभिषेक कड, ऋषिकेश कड, कार्तिकी कड, अंकिता कड, आदित्य घुले, सोहम सातव, ओम घुले, किरण कड, निकिता काळोखे या बालचमूंनी डोमखेल रोड नामदेव कॉम्प्लेक्स येथे मुरुड जंजिरा किल्ल्याची भव्य प्रतिकृती बनवली आहे.
या कलाकृतीचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील व वाघोली ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल शिंदे, मच्छिंद्र सातव पाटील, अभिजीत सातव पाटील, महेश कड व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.