दिवाळी दणक्‍यात

बाजारपेठांत प्रचंड उत्साह ः दुकाने हाऊसफुल
 
पुणे – सुट्टी, पावसाची विश्रांती आणि लक्ष्मीपूजनाची पूर्वसंध्या असा योग पुणेकरांनी साधल्याने शनिवारी शहरांतील बाजारपेठा फुलल्या होत्या. आनंद आणि मांगल्याच्या सणाला शुक्रवारी उत्साहात सुरूवात झाले.
दिवाळीत अनन्यसाधारण महत्त्व असणारे लक्ष्मीपूजन रविवारी आहे. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील सर्वच बाजारपेठा फुलल्या असून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली. आबालवृद्धांच्या आवडीच्या दिवाळीसाठी दुकानेदेखील आकर्षक रोषणाईने सजली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. मंडई, रविवार पेठ, कसबा पेठ, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बोहरी आळी या प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांमध्ये साहित्याच्या खरेदीचे स्टॉल लागले होते.

लक्ष्मीपूजनासाठी आवश्‍यक असणाऱ्या लक्ष्मी मूर्ती, केरसुणी, पूजा साहित्य, लाह्या, बत्तासे, फुले, विड्याची पाने, रांगोळी, रंग यांसह नरक चतुर्दशीसाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्य याची खरेदी करण्यात महिलावर्गाची विशेष लगबग शहरात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर सराफ बाजारतही चांगलीच गर्दी होती. यासह फराळाचे पदार्थ आणि मिठाई खरेदीसाठी देखील सर्व दुकाने हाऊसफुल्ल झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.