वाहन, सोने-चांदी तसेच बांधकाम व्यावसायात उलाढाल
बारामती – बारामतीच्या बाजारपेठेत दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठी उलाढाल झाली विशेषत: वाहन खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती दिली. सोन्या-चांदीतील उलाढालीनंतर सर्वाधिक उलाढाल वाहन विक्री व्यावसायात झाली. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांची विक्री वाढली तसेच दुचाकी खरेदीतही विविध कंपन्यांनी टार्गेट पूर्ण केल्याने या उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे सांगण्यात आले.
वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना देखील दिवाळी सणाचा मुहूर्त वाहन उद्योगासाठी खास ठरला. बारामती बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी दिवाळीतील धनत्रयोदशी ते भाऊबीत पर्यंत उलाढाल राहीली. दसऱ्या पेक्षा दिवाळीचे चार दिवस वाहन उद्योगासाठी उलाढीलीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. चारचाकी, दुचाकी वाहनांतील उलाढीलनंतर सोन्या-चांदीची बाजारपेठे फुलल्याचे तसेच बांधकाम व्यावसायातही गुंतवणूक झाल्याचे सांगण्यात आले.
दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकांनी स्वतःचे घर खरेदीस प्राधान्य दिल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडील नोंदीवरून स्पष्ट झाले. एकूणच ही दिवाळी मोठ्या उद्योगांसाठी मोठी उलाढाल घेवून आली. वाहन, सोने-चांदी तसेच बांधकाम व्यावसायात उलाढाल
वाहन उद्योगावर मंदीचे सावट असताना देखील वाहन कंपन्यांच्या ग्राहकांसाठीच्या विविध योजनांमुळे चारचाकी तसेच दुचाकी वाहन खरेदीस ग्राहकांनी पसंती दिली. मारूती कंपनीची दसऱ्याला 98 चारचाकींची विक्री झाली होती दिवाळी ती 83 वाहनांवर गेली. तर होंडाच्या 90 चारचाकी दसऱ्याला तर दिवाळीला 100 गाड्यांची विक्री झाली. दुचाकीत हिरो कंपनीच्या दसरा-दिवाळी मुहूर्तावर 950 गाड्या विक्री झाल्या. यातूनच दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन बाजारपेठीला वेग आला आहे.
– सचिन सातव, संचालक, महालक्ष्मी उद्योग समुह