…अन्यथा कार्यालयाचा ताबा घेऊ

आंबेगाव तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिव्यांगांचा इशारा

मंचर – आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये अपंग कक्ष स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा पंचायत समितीचा ताबा घेतला जाईल, असा इशारा अपंग हित, विकास आणि पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी दिला.

पंचायत समितीमध्ये अपंग सहायता कक्ष स्थापन करण्याची मागणी एक महिन्यापूर्वी केली होती. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी अपंग कक्ष सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु ते सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी थेट पठारे यांचे कार्यालय गाठवले व त्यांना जाब विचारत सुमारे 25 दिव्यांग बांधवांनी जागतिक अपंग दिनाच्या दिवशी कार्यालयात ठाण मांडत अपंग कक्षाची स्थापना करण्याची मागणी केली.

यावेळी घोडेगावचे ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे उपस्थित होते. गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे यांच्याशी सभेमध्ये विषय झाल्यानंतर अपंग कक्ष देऊ, असे पुन्हा सांगितले. पुढील महिन्यात अपंग कक्ष स्थापन न केल्यास पंचायत समितीचा ताबा घेतला जाईल, असा इशारा
देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.