अकोले, (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील देहू येथील युनिक सोशल नेट फाउंडेशनच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील ग्रामपंचायतीला दिव्यांग व्यक्तींसाठीची सायकल कायमस्वरूपी भेट देण्यात आली.
युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश आवारी आणि उपाध्यक्ष प्रदीप हासे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील देहू गाव येथील युनिक फाउंडेशनने यावर्षी जवळपास १५ ग्रामपंचायतींना अशा दिव्यांग सायकलचे वितरण केले आहे.
यात अकोले तालुक्यातील वितरणाचे लाभार्थी ग्रामपंचायत धामणगाव आवारी आणि वैयक्तिक लाभार्थी म्हणून सोनाली राधाकिसन पोखरकर यांना देखील लाभ देण्यात आला.
यावेळी सरपंच पूनम आवारी, उपसरपंच गणेश पापळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राधाकिसन पोखरकर, रमेश आवारी, नीताताई आवारी, बाळासाहेब आवारी, मच्छिंद्र आवारी, कविता पोखरकर, अण्णासाहेब पापळ, सचिन कोकणे, सुनीता मेंगाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.