मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ज्येष्ठ गायक सोनू निगम यांनीही बॉलीवूडच्या संगीत उद्योगात माफिया असल्याचे आणि युवा गायकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. टी-सीरिजचा मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पुन्हा एकदा सोनू निमगवर निशाणा साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने सोनू निमगने भूषण कुमारवर केलेल्या आरोपांचे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
दिव्या खोसला कुमार या व्हिडीओमध्ये म्हणतेय, गुलशन कुमार यांच्या निधनानंतर भूषण कुमारने सोनू निगमकडे मदत मागितली होती. त्यावेळी भूषण खूप लहान होते पण सोनू निगमने मदत करण्याऐवजी दुसर्या कंपनीशी करार केला. दिव्या पुढे म्हणते की सोनू निगमने आजवर आपल्याशिवाय इतर कोणत्याही गायकाला संधी दिली नाही. पण टी-सीरिजमध्ये काम करणारे 97 टक्के लोक बाहेरचे आहेत.
सोनू निगम दिल्लीतील रामलीलामध्ये पाच रुपयांमध्ये गायचा. त्यावेळी, गुलशन कुमार यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला संधी दिली.गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर सोनू निगम दुसर्या कंपनीसोबत काम करु लागला. तेव्हा भूषण कुमार 18 वर्षांचे होते आणि त्यांनी सोनू निगमकडे मदत घेतली होती आणि आज ते या व्हिडिओद्वारे जगाला सांगितले जाते आहे.