दिव्या देशमुखला बुद्धिबळात रजतपदक

पुणे: आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने युवा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुंबईत झालेल्या या स्पर्धेत दिव्याने 14 वर्षांखालील मुलींच्या गटात ही कामगिरी केली.

अखिल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अकराव्या फेरीत दिव्याने आठवा गुण नोंदवत उपविजेतेपद निश्चित केले. अर्ध्या गुणाने तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली. दिव्याला सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.

त्यामुळे तिला गुण नोंदवण्यात अपयश आले. मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये तिने उत्तम खेळ करत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. या स्पर्धेत दिव्याने रशियाची फिडे मास्टर नॅसरोवा एकेतेरिनावर हिचा पराभव केला.

या स्पर्धेचे विजेतेपद कझाकस्तानच्या कामलिनदेनोवा मेरुअर्टने साडेआठ गुणांसह पटकावले. दुसरीकडे 16 वर्षे वयोगटात नागपूरची बुद्धिबळपटू मृदूल डेहनकर हिने 7 गुण नोंदवत 15वे स्थान पटकावले.

Leave A Reply

Your email address will not be published.